
कुपवाड :सनीभाऊ धोतरे युथ फाउंडेशनच्या वतीने कुपवाडमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या १,११,१११ /-रूपयाची दहीहंडी शिरोळच्या गोडीविहार तालीम मंडळाच्या गोविंदानी दहीहंडी फोडून बाजी मारली.
या दहीहंडीत तीन संघाने सहभाग घेतला होता.
सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील व सांगली काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिततीत उद्योजक रमाकांत घोडके, सांगली जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक आनंदराव नलवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांच्यासोबत माजी महापौर किशोरदादा जमादार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी विरोधी पक्षनेता किरण सूर्यवंशी, नामदेव कस्तुरे सर, माजी नगरसेवक मंगेशदादा चव्हाण, कुपवाड काँग्रेस शहर अध्यक्ष सनीभाऊ धोतरे, माजी उपमहापौर विजय घाडगे, माजी नगरसेवक रवींद्र वळवडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते अण्णासाहेब उपाध्ये, अय्याजभाई नायकवडी, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, बाळासाहेब मंगसुळे, माजी नगरसेवक प्रकाश व्हनकडे, सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, व्हा. चेअरमन दिपक कदम, माजी दर्गा सरपंच अख्तरहुसेन मुजावर, दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर, व्यापारी संघटनेचे अनिल कवठेकर, महासंघाचे राजेंद्र पवार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ, उपाध्यक्ष बिरु आस्की, प्रमोद [बंडू] पाटील, माजी शहरप्रमुख अमोल कदम यांची प्रमुख उपस्थितीत दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात व फटाक्यांचे आतिषबाजीत पार पडला.
या दहीहंडीसाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारणारे कलाकार सुमित पुसावळे, पुणेतील नृत्यकलाकार स्नेहा पिंपरीकर व रिल्स स्टार निवृत्ती उर्फ नारू,विशाल,बालाजी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवुन कुपवाडकरांचे मनोरंजन केले.
कुपवाडमधील या दहीहंडीत गोडीविहीर या विजेत्या संघास १,११,१११/-रुपयांचे पारितोषिक पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे संयोजन राहुल पाटील, समीर मुजावर, श्रीकृष्ण कोकरे, दिलीप धोतरे, सिकंदर मुल्ला, सकलेन मुजावर, कुलभूषण कर्नाळे, फिरोज मुजावर, नूरमहंमद ढालाईत, इम्रान मुजावर, संजय सरोदे, नाना धोतरे, सुनील माने, पंकज धोतरे, जयसिंग धोतरे, शेलार सरोदे, दीपक सरोदे, रवी सरोदे, राकेश सरोदे, सुरज धोतरे, समाधान धोतरे, सिकंदर मुजावर व सनी धोतरे युथ फौंडेशनचे सर्व कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी काँग्रेस कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोतरे यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.