वर्गणीच्या नावाखाली पैसे उकळून दमदाटी करणाऱ्या दोघांना शिक्षा..

कुपवाड : रामकृष्णनगरमध्ये दि.१३ सप्टेंबर २०१५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास दिपक हेमंत जाधव ( वय१९ वर्ष ) रोहित हेमंत जाधव ( वय २२ वर्ष ) दोघेही रा.रामकृष्णनगर, कुपवाड तर दोन अल्पवयीन ( वय वर्ष १६ व १७ दोघेही रा.यशवंतनगर, कुपवाड )
या चौघांनी संघनमताने फिर्यादी खातून मौला मोमीन
( वय ४५ वर्ष रा.रामकृष्णनगर, कुपवाड ) यांच्या राहत्या घरात घुसून गणपती वर्गणी ५०० रुपयाची मागणी करत आरोपीने फिर्यादी खातून व तिचे मुलास शिवीगाळ केली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता.
आरोपीने पुन्हा एकदा दि.०२ मार्च २०१६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास खातून यांच्या सूतगिरणी महात्मा फुले सोसायटी येथे भाडयाने राहत असलेल्या घरात जाऊन खातून व तिचे मुलास जीवेमारण्याची धमकी व शिवीगाळ केली होती. याप्रकरणी खातून ने कुपवाड पोलिसांत धाव घेऊन आरोपीचा नावे तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्ह्यात आरोपी दिपक जाधव व रोहित जाधव यांना दोषी ठरवून न्यायालयाने १ वर्ष चांगल्या वर्तुणुकीच्या बॉण्डवर खुले केले. फिर्यादी खातून यांना नुकसान भरपाई म्हणून आरोपीने प्रत्येकी पाचपाचशे रुपये देण्याचे आदेश दिले.