माघेल त्या उद्योजकाला पाहिजे तेवढा वीजपुरवठा होणार सप्नील काटकर मुख्य अभियंता यांची ग्वाही. कृष्णा व्हॅली चेंबरच्या सभागृहात उद्योजक व महावितरणचे पदाधिकारी यांची बैठक.

कुपवाड : कृष्णा व्हॅली चेंबरमध्ये औद्योगिक वसाहती मधील उद्योजक व महावितरणचे अधिकारी यांचे संयुक्त बैठक घेण्यात आली. सदर बैठकीसाठी महावितरणचे कोल्हापूर विभागाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू, अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर, कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर उपस्थित होते.
यावेळी स्वागत व प्रास्ताविकांमध्ये संस्थेचे अध्यक्ष मालू यांनी कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील असणारे ज्वलंत प्रश्न मांडले. मालू म्हणाले की शक्य असेल तेथीलच मेंटेनन्स करण्यात यावे. कुपवाड औद्योगिक वसाहती मधील प्रलंबित असलेल्या सब स्टेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. सध्या कुपवाड महावितरण ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तरी तेथे लवकरात लवकर कर्मचारी भरून कामास गती द्यावी. प्रत्येक मंगळवारी महावितरण कडून विद्युत पुरवठा बंद असतो मंगळवार ऐवजी रविवारी करण्यात यावा. तसेच त्यांनी सध्या कुपवाड महावितरण ऑफिस कडून चांगल्या पद्धतीने सोयी सुविधा मिळतात याचाही आवर्जून उल्लेख केला.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी विचारलेल्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने उत्तरे देऊन महावितरण हे नेहमीच उद्योजकांच्या पाठीशी नेहमीच उभे असते तसेच ज्यांना आणखीन विद्युत पुरवठ्याची गरज आहे त्यांना लवकरच विद्युत पुरवठा लवकर करून देण्यात येईल तसेच आपणास कोणतीही महावितरण कडून लाईट संदर्भात अडचण असेल तर महावितरण संपर्क साधावा. लवकरच आपल्या अडचणींचे निराकरण करण्यात येईल. तसेच त्यांनी महावितरणकडून स्वागत कक्ष सुरू आहे. औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारी, कोणतीही माहिती पाहिजे असेल तर ती आपण स्वागत कक्षाच्या मेल वरती मांडू शकता. आपण मांडलेल्या सर्व समस्यांचे निरसन त्वरित होईल.
तिसऱ्या व चोथ्या मंगळवारी वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने चालू राहील तुम्ही कारखाने चालू ठेवू शकता असेही ते म्हणाले.मान्यवरांचे आभार संस्थेचे संचालक रमेश आरवाडे यांनी मांडले. यावेळी संस्थेचे संचालक हरिभाऊ गुरव, बी.एस. पाटील, नितीश शहा, पांडुरंग रुपनर, दिनेश पटेल, उद्योजक टेकचंद असिवाल, अनिल कांबळे, राजेंद्र पाटील, प्रशांत माळगे, यशवंत गोटे, कांतीलाल पटेल, संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.