
कुपवाड शहरात गेल्या काही महिन्यापूर्वी 8 जुलैला वाघमोडेनगर या परिसरत (कुपवाड) येथे जुना वाद उफळून सागर राजाराम माने याच्यावर तरुणांनी पिस्तूल रोखल्याची घटना घडली होती. या घटनेचा काही दिवसांत कुपवाड पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून एका अल्पवयीन मुलासह नऊ संशयितांना अटक केली.
या गुन्ह्याच्या तपासातंर्गत चार एडके, तीन पिस्तुले, पाच काडतुसे असा एकूण 1 लाख 51 हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या या विशेष कामगिरीबाबत मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, कुपवाडचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, पोलिस हवालदार आप्पासो नरुटे, संदीप पाटील, गजानन जाधव, राहुल जाधव, अंमलदार सचिन कनप आदींचा (ता.28) ऑगस्ट बुधवारी सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.