
कुपवाड -शहरात पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सनीभाऊ धोतरे युथ फौडेशनच्या वतीने कुपवाडमध्ये प्रथमच गोकुळ जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे आयोजन केले आहे.
कुपवाडातील दहीहंडी 31 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजाता अकुज ड्रिमलँड सोसायटी चौक, कुपवाड येथे रु.१,११,१११/ रुपयांची होणार असून या दहीहंडीसाठी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम व सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीने होणार असून, मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे
प्रमुख आकर्षण…
या दहीहंडीचे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षन कलर्स मराठीवरील संत बाळूमामा या मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारे कलाकार श्री. सुमित पुसावळे हे उपस्थितीत राहणार असून, स्नेहा पिंपरीकर, पुणे यांचा भव्य डान्स शो होणार आहे. तसेच रिल्स स्टार निवृत्ती [नारू], बालाजी आणि विशाल उपस्थित असणार आहे.
महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था केली आहे. कुपवाड शहर काँग्रेस अध्यक्ष सनी धोतरे यांनी पत्रकार परिषदेत 31 ऑगस्टला आयोजन केलेल्या दहीहंडीची माहिती सांगितली.
यावेळी बाळासाहेब मंगसुळे, अख्तरहुसेन मुजावर, श्रीकृष्ण कोकरे, राहुल पाटील, समीर मुजावर, सिकंदर मुल्ला, अनिल कवठेकर, राजेंद्र पवार, दिलीप धोतरे, अमोल कदम, नूरमहंमद ढालाईत, सकलेन मुजावर, कुलभूषण कर्नाळे, सुरज धोतरे आदी उपस्थित होते.

तरी या दहीहंडी पाहण्यास आवर्जून व मोठ्या संख्येने कुपवाड, सांगली शहरातील लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सनी धोतरे युथ फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.