
खटाव तालुका मिरज येथे आज खटाव येथे आत्महत्या केलेल्या कुटुंबाचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले सांत्वन. संतोष सुजाता कांबळे वय वर्ष 28 यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
त्यांच्या पत्नीला गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री सहायता निधीतून शासकीय मदत देण्याचे पालकमंत्री यांनी जाहीर केले आहे.
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्वतः तीन मुलींची पालकत्व स्वीकारले आहे. त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च बघणार आहेत. शासनाच्या विविध योजनेतून त्यांना मदत मिळवून देणार. संजय गांधी निराधार योजने मधून पेन्शन समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदत त्यांना तातडीने मिळण्यासाठी स्वतः पालकमंत्री यांनी फोन करून मदत तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी काकासाहेब धामणे माजी पंचायत समिती सभापती वैभव नलवडे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे बाळासाहेब होनानावर. किरण कांबळे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे युवा नेते पत्रकार परशुराम बनसोडे सुरेश परीट श्याम कांबळे उपस्थित होते.