मालगावचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर दोन दिवसात निलंबनाच्या कारवाई ची मागणी

मिरज : मालगावचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर कारवाई दोन दिवसात करा प्राध्यापक प्रमोद इनामदार यांची मागणी
येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक सुरज जगताप यांच्यावर कारवाई न केल्यास आंबेडकरी समाजाच्या वतीने उग्र आंदोलन करण्याच्या इशारा प्रमोद इनामदार यांनी दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. मिरज पंचायत समिती समोर बसलेल्या आंदोलकाचे आज भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पाठिंबा जाहीर केला आहे.
या आंदोलनाला आरग गावचे युवा नेते सागर आवळे विजय आवळे जयंत मगरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. जोपर्यंत सुरेश जगताप यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार.