
मिरज:जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यावर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे मालगावचे नेते काकासाहेब धामणे यांच्या दबाव तंत्रामुळे मालगावचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर कारवाई केली जात नाही.
असा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा आरोप येणाऱ्या दोन दिवसात ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास सांगली जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरेल. प्रशासनाने आंबेडकरी समाजाचे अंत पाहू नये तत्काळ जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीस गैरहजर राहणाऱ्या ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.