
टाकळी मिरज रस्त्यावर अपघात होऊन मयत झालेल्या युवकाच्या कुटुंबाला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे कडून एक लाखाची मदत..
दोन दिवसांपूर्वी टाकळी मिरज रोडवर सावंत प्लॉट येथील हर्षवर्धन भगवान कोकरे वय 16 हा युवक मिरज कडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडकून अपघात झाला होता या अपघातात सदर तरुणाचा मृत्यू झाला.
पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी अपघात ग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व त्यांना मानसिक आधार दिला.यावेळी सदर कुटुंबाला मदत म्हणून एक लाख रुपये देण्याचे कबूल केले सदर कुटुंबाला आधार देण्यासाठी पालकमंत्री आले असता मयत मुलाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या भावना अनावर होऊन त्यांना रडू कोसळले. हे सर्व दृश्य पाहून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना देखील दुःख झाल्याचे दिसून आले.
उपस्थित नागरिकांच्या मागणीनुसार सावंत प्लॉट समोरील रोडवर त्वरित स्पीडब्रेकर बसवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सूचना दिल्या आहेत.