निवडणूक विशेष: सांगली जिल्ह्यात १० फेब्रुवारीपर्यंत शस्त्रबंदी लागू

सांगली, ता.१४ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शस्त्रबंदीचे आदेश जारी केले आहेत. १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ (रात्री १२ वाजेपर्यंत). संपूर्ण जिल्ह्यात तलवार, भाला, चाकू यांसारखी हत्यारे, स्फोटक पदार्थ किंवा दारुगोळा बाळगून फिरण्यास पूर्णतः मनाई असेल. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना हा नियम लागू नसेल.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button