सांगलीकरांनो लक्ष द्या! धामणी रोडवरील ‘हसरा चौक’ १७ ते २२ जानेवारीदरम्यान वाहतुकीस बंद; पाहा पर्यायी मार्ग

सांगली, ता१४ जानेवारी : धामणी रोड परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक कामासाठी धामणी रोड येथील ‘हसरा चौक’ हा रस्ता १७ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मोटर वाहन कायद्यान्वये हे आदेश निर्गमित केले आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी वाहतूक मार्ग जाहीर केले असून, नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


असे असतील पर्यायी वाहतूक मार्ग:
१. इनाम धामणीकडून सांगली शहरात येण्यासाठी:
इनाम धामणी – हॉरिझोन्टल हॉस्पिटल – (येथून डावीकडे वळून) उषःकाल हॉस्पिटल – तक्षशिला रोड – १०० फुटी मार्गे शहरात जाता व येता येईल.
२. दुसरा पर्यायी मार्ग (शहरात येण्यासाठी):
इनाम धामणी – जुना जकात नाका – वसंतराव शिंदे मार्ग – लिमये चौक – स्फूर्ती चौक – एम.एस.ई.बी. रोड मार्गे शहरात ये-जा करता येईल.
३. शांतीबन चौकाकडून इनाम धामणीकडे जाण्यासाठी:
शांतीबन चौक १०० फुटी रोड – डी-मार्ट पुढे डावीकडे वळून तक्षशिला रोड – उषःकाल हॉस्पिटल – हॉरिझोन्टल हॉस्पिटल – (येथून उजवीकडे वळून) धामणीकडे जाता व येता येईल.


जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश:
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मोटर वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ आणि ११६ नुसार हे आदेश दिले आहेत. रस्ता कामाच्या स्वरूपानुसार हे बदल करण्यात आले असून, वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


महत्वाची टीप: १७ जानेवारीच्या सकाळपासूनच हे बदल लागू होतील, त्यामुळे कामावर किंवा शाळा-कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांनी वेळेचे नियोजन करून घराबाहेर पडावे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button