मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या
अर्ज भरण्यास 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

सांगली:जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी अर्जास 16 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून 65 वय वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात आली आहे.या योजनेस पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न असणाऱ्या बँक खात्यावर तीन हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत.
या योजनेचे अर्ज करण्याची दि.7 ऑगस्ट 2024 पर्यंत होती.ती वाढवून आता16 ऑगस्ट 2024 करण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.
लागणारे कागदपत्रे
विशेष सूचना अर्जासोबत विहीत स्वघोषणापत्रे,आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
अर्ज विनामूल्य असून तो इथून मिळेल.
आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,समाज कल्याण कार्यालय सांगली यांचेकडून उपलब्ध करुन घ्यावेत व परिपुर्ण अर्ज त्यांचेकडेच विहित मुदतीत सादर करावे.या योजनेचा सांगली मनपा क्षेत्रातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त चाचरकर यांनी केले आहे.