
सांगली, ६ नोव्हेंबर (राजकीय प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी (भाजप) सांगली जिल्हा संघटनेमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी माजी मंत्री मा. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची सांगली जिल्ह्याच्या ‘जिल्हा निवडणूक प्रभारी’ पदी नियुक्ती केली आहे. खाडे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी आल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. खाडे यांच्यासोबतच सांगली शहर आणि ग्रामीण भागासाठीही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रमुख नियुक्त्या
सांगली जिल्हा निवडणूक प्रभारी मा. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे (माजी मंत्री) , सांगली शहर निवडणूक प्रमुख मा. शेखर इनामदार सांगली आणि ग्रामीण निवडणूक प्रमुख मा. आ. सत्यजीत देशमुख यांच्या या प्रमुख नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
माजी मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या अनुभवाचा, तसेच शेखर इनामदार यांच्या शहर पातळीवरील आणि सत्यजीत देशमुख यांच्या ग्रामीण भागातील मजबूत नेतृत्वाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला होणार आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्त्यांमुळे सांगली जिल्ह्याच्या राजकीय गणितांना नवी दिशा मिळणार आहे, असे मत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.