मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.०

महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल आणि कॉल फॉर प्रपोझल पोर्टलचं उद्घाटन

मुंबई, ता.२८: महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.०’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचं तसेच महाराष्ट्र एआय धोरण २०२५–२०२९” अंतर्गत कॉल फॉर प्रपोझल आणि कॉल फॉर प्रपोझल पोर्टलचं उद्घाटन आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आलं.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पा महाराष्ट्रातील शेतीला शाश्वत, सक्षम आणि हवामान-संवेदनशील बनविण्यासाठीचा टर्निंग पॉईंट आहे. तर, कॉल फॉर प्रपोझल उपक्रमाद्वारे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT), ड्रोन तंत्रज्ञान, आणि डेटा-आधारित उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक साधनांच्या वापराला चालना मिळणार आहे. तसेच, कॉल फॉर प्रपोझल पोर्टलमुळे राज्यभरातील स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), शेतकरी उत्पादक संस्था (FPO) आणि संशोधन संस्थांकडून आपल्या तंत्रज्ञानाधारित कल्पना सादर करून शाश्वत शेतीसाठी नवे उपाय सादर करण्यात येतील. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विकास चंद्र रस्तोगी (अपर मुख्य सचिव, कृषी), परिमल सिंह (प्रकल्प संचालक), कृषी विभागातील अधिकारी, प्रकल्प संचालक मंडळ, जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button