ITI कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून स्वच्छतेचे प्रबोधन

सांगली, ता.१८: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेने “स्वच्छता ही सेवा २०२५”, “स्वच्छ सर्वेक्षण” आणि “माझी वसुंधरा” या महत्त्वपूर्ण अभियानांना गती देण्यासाठी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार आज १७ ऑक्टोबर २०२५ एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला.

वॉर्ड क्रमांक ११ मधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सांगली येथे महानगरपालिका आणि ITI यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वच्छता प्रबोधन व शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे महत्त्वाचे मुद्दे:

  • मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर आणि स्वच्छता निरीक्षक श्री. याकूब मद्रासी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, त्याचे आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम समजावून सांगितले.
  • विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध स्वच्छतेचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
  • ITI कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहराची स्वच्छता व सुंदरता राखण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी ITI चे प्राचार्य श्री. एम. डी. जोशी, उपप्राचार्य देशपांडे सर, गटनिदेशक गोसावी सर, शिल्पनिरीक्षक चेतन कोकुटनर, क्लार्क शहाजी पाटील क्षेत्रीय कार्यालय क्र. १ मधील स्वच्छता निरीक्षक रवी साबळे, गणेश माळी, धनंजय कांबळे, प्रणील माने, किशोर कांबळे, मुकादम अमोल घनके, गणेश कांबळे व मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button