हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, ता.१६: जिल्ह्यातील हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी) यांच्या वतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.

योजनांचा तपशील:

  • अनुदान योजना: या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना 50 हजार रुपयांपर्यंत असून त्यामध्ये 25 हजार रुपये हे अनुदान म्हणून व 25 हजार रुपयांपर्यंत बँक कर्ज लाभार्थ्याला दिले जाते.
  • बीज भांडवल योजना: या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 7 आहे. ही योजना 5 लाख रुपयांपर्यंत असून बँकेची रक्कम 75%, लाभार्थीचा सहभाग 5% व महामंडळाचे बीज भांडवल 20% व अनुदानाचा 50,000 रुपयांचा समावेश आहे.
  • थेट कर्ज योजना: या योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 3 आहे. ही योजना एक लाख रुपयांची असून महामंडळाची बीज भांडवल रक्कम 75 हजार रुपये व अनुदान रक्कम 20 हजार रुपयांपर्यंत दिली जाते. लाभार्थीचा सहभाग 5% आहे.

अर्ज कसा करावा अर्जदारांनी

www.hindukhatiksamaj.com

या वेबसाइटवर जाऊन अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून महामंडळाकडील सर्व योजनांचा लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली. दूरध्वनी क्रमांक: 0233-2325659 संपर्क करावा.

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button