जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न मार्गी

सांगली, ता.१६: जिल्ह्यातील उद्योजकांसाठी एक चांगल्या बातमी आहे. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ही माहिती उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली.

क्लस्टरच्या कामातील प्रगती

जिल्ह्यात तीन क्लस्टरचे काम पूर्ण झाले असून, पाच क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये इंजिनिअरींग क्लस्टर कुपवाड, डिजीटल प्रिंटिंग क्लस्टर मिरज आणि रेझिन क्लस्टर जत सामाईक सुविधा केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले असून मशिन प्राप्त झाले आहेत. तसेच बेदाणा क्लस्टर चिंचणी, इंजिनिअरींग क्लस्टर कडेगाव, टर्मरिक क्लस्टर इस्लामपूर, लेदर क्लस्टर जत आणि म्युझिकल क्लस्टर मिरज आदि क्लस्टरला मंजुरी मिळाली असून, बांधकाम व मशिनरी स्थापित करण्याचे काम सुरू आहे.

एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते दुरुस्ती

एमआयडीसी क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने उद्योग विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासन 50%, महापालिका 25% व उद्योजकांनी 25% रक्कम भरणे अपेक्षित आहे. याप्रकरणी उद्योजकांनी 25% रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवल्याने, या प्रलंबित प्रश्नी महापालिका व नगरविकास विभागाने पर्यायी मार्ग काढावा, असे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी सूचित केले.

उद्योजकांसाठी सुविधा

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2025 पासून जिल्हा उद्योग मित्र समिती सभेच्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले गेले. यामध्ये कुपवाड जकात नाका ते भारत सूतगिरणीपर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. देशिंग औद्योगिक कार्यक्षेत्रात नियमित वीजवितरण केले जात आहे. कुपवाड ते एमआयडीसीपर्यंत असणारे विजेचे खांब काढण्यात आले आहेत.

गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीतील प्रगती

गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीतील पथदिवे बसवण्यात आले आहेत. कचरा गाडी सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्याचे काम व गटर काम पूर्ण करण्यात आले आहे. मिरज एमआयडीसी क्षेत्रात रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स बसवण्यात आले आहेत. तसेच खोक्यांचे अतिक्रमण काढण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button