बुधगाव ग्रामपंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दीपावली महोत्सवाचे आयोजन

बुधगाव, ता.१५: बुधगाव ग्रामपंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत दीपावली महोत्सवाचे आयोजन. बुधगांव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत दिपावली महोत्सवानिमित्त महिला बचतगटांच्या व घरेलू महिला व्यावसायिकांनी त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपल‌ब्ध व्हावी यासाठी वस्तूंचे प्रद‌र्शन व मालाची विक्री स्टॉलचे आयोजन जाखोटिया मंगल कार्यालय माधवनगर येथे जि.पी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या शुभहस्ते करणेत आले. यावेळी मिरजे पंचायत समितीचे गट्टविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, सौ. अंजू तोरो सरपंच माधवनगर कौ मा. श्री. शिवाजीराव खरात जिल्हा व्यवस्थापक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करणेत आले.

जिल्हा परिषदे‌चे मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी बुधगांव ग्रामपंचायतीच्या वतीने करणेत आलेल्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच महिला बचत गटांच्या व घरेलू महिला महिला व्यावसायिकांना व त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळाल्यास गावोगावी मोठ्या प्रमाणात लखपती दिदी तयार होतील व यातूनच महिला सबलीकरण व सक्षमीकरण होणेस मोठ्या प्रमाणात मदत होइल त्याचप्रमाणे बचन गांच्या मालाला व विक्री व्यवसायाला प्रोत्साहन देणेच्या दृष्टीने कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जि. परिषद व बचत मार्फत जागा उपलब्ध करुन देवून बचतगट बचतगटांच्या सहकार्याने विक्री केंद्र सर्व सोगीसुविधा नियुक्त जिल्हास्तरावर कायम‌स्वरुपी विक्री केंद्र निर्माण करणेचे नियोजन असलेचे मत व्यक्त केले.

बुधगाव, ग्रामपंचायतीच्या वतीने व विकासपर्व प्रभागसंघ बुधगांव यांच्या वतीने आयोजित करणेत आलेल्यामालाचे प्रदर्शन व या विक्री मालाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी बुधगाव गावच्या सरपंच सौ. वैशाली पाटील उपसरपंच अविनाश शिंदे प्रभाण संघाच्या अध्यक्षा सौ. माधवी पाटील, ग्रामपंचायत सदस्या सौ. शुभांगी शिंदे, सारिका पवार, सपना गोसावी, शुभांगी कोळी, सिरीन चौगुले, जयश्री पाटील, मिनाक्षी चव्हाण, मिनाक्षी एडके, श्रीमती उज्वला शिंदे, महिला बचत गटांच्या महिला प्रतिनिधी, स्टॉलधारक गावामधिल व परिसरातील नागरिक बांधव उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button