
कुपवाड, ता.१२: एका महिलेला पैशाचे आमिष दाखवून दोन अनोळखी पुरुषाची शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने एक महिला व दोन अनोळखी पुरुषाविरुद्ध कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने पोलीसांत फिर्याद दिलेली आहे.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ व माहे जून २०२५ मध्ये (नेमकी तारीख माहीत नाही) एका महिलेने पीडितेला वेळोवेळी वड्डी,गावी येथील एका शेतातील घरात नेऊन पैशाचे आमिष दाखवून दोन अनोळखी पुरुषाशी पीडित महिलेला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने पीडित महिला आठ आठवडे तीन दिवसांची गरोदर राहिली आहे. याबाबत पिडीत महिलेने कुपवाड पोलीसांत तक्रार दाखल केली असून एक महिला व दोन अनोळखी पुरुषाविरुद्ध बलात्कार आणि भारतीय अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा हे करत आहेत.