
शक्ती’ चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले; महाराष्ट्र आणि गुजरातवरील थेट धोका कमी झाला आहे. तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह किनारपट्टी भागांसाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळण्याची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सागरी सुरक्षिततेसाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, सोमवारी हे चक्रीवादळ वळण घेऊन पुन्हा गुजरातच्या दिशेने सरकू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.