
कुपवाड , ता.५ : तानंग (ता. मिरज) येथे एका सत्तर वर्षीय वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धोंडीराम उद्धव पाटील (वय ७० रा. पाटील मळा, तानंग) असे मयताचे नाव आहे. घटनेची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत पाटील तानंग) येथे वास्तव्य करत. राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार हा रविवार (ता.५) उघडकीस आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह आयुष टीमच्या मदतकार्याने शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.