सांगली, ता.३ : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सदस्य आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करण्याचा ३ नोव्हेंबर २०२५ असा आहे, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी आरक्षण सोडत कार्यक्रमाचा टप्पा व टप्पा सुरू करण्याचा / संपविण्याचा दिनांक पुढीलप्रमाणे. प्रारूप आरक्षण – (१) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता जागा निश्चित करण्यासाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करणे –६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत. (२) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता राखीव जागांच्या प्रस्तावास मान्यता देणे – ८ ऑक्टोबर २०२५ पर्यंत. (३) आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे (नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला [अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] – १० ऑक्टोबर २०२५. (४) आरक्षणाची सोडत काढणे [नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील व सर्वसाधारण महिलांसह) बाबत] जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी – १३ ऑक्टोबर २०२५. प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिध्द करणे – १४ ऑक्टोबर २०२५ हरकती व सूचना – जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी –१४ ऑक्टोबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ प्राप्त प्रारुप आरक्षणावरील हरकती व सूचना आधारे अभिप्रायांसह गोषवारा विभागीय आयुक्त यांना सादर करणे – २७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत. प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन आरक्षण अंतिम करणे – ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत. अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – ३ नोव्हेंबर २०२५