सांगलीत शुक्रवारपासून तीन दिवसीय फळ महोत्सव

सांगली, ता.१७: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्यावतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून तीन दिवसीय “सांगली फळ महोत्सव-२०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. हा फळ महोत्सव दि. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होणार असून, या महोत्सवाचे उद्घाटन १९ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता पद्मभूषण डॅा. वसंतदादा पाटील स्मृतीभवन, मार्केट यार्ड, सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते होणार आहे.

या महोत्सवास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन फळांचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगनफ्रुट, डाळिंब, पेरू, सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button