
मुंबई – दादर एका अज्ञाताने मुंबई पोलिसांना कॉल करून दादर सारख्या गर्दीच्या ठिकाणातील मॅकडोनाल्ड बॉम्बनं उडवणार असल्याचं सांगितल्यानं पोलिसांमध्ये तारांबळ उडाली. अज्ञात व्यक्तीनं कॉलवर सांगितलं की, तो बेस्टच्या बस क्रमांक 351 मधून प्रवास करत असताना दोन व्यक्ती मॅकडोनाल्ड उडवण्याचे चर्चा करत असलाचे ऐकलं. याबाबतची माहिती अज्ञात कॉलरनं मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून दिली. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले. तपासाचा वेग जोरांने फिरवला. मात्र, यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यामुळं आता मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात कॉलरचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.