तिसंगी-घाटनांद्रे सुनिल शिंदेच्या खुनाचा स्थानीक गुन्हे शाखेकडून छडा; दोन संशयित ताब्यात, एक फरार

कवठेमहांकाळ ता.९: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तिसंगी-घाटनांद्रे रस्त्यावर सुनिल शिंदेच्या खुनाचा छडा लावून दोन संशयितांना ताब्यात घेतले. खुनातील एक संशयित फरार. तिसंगी ते घाटनांद्रे रस्त्यालगतच्या शेतात सोमवारी (ता.८) रोजी सकाळी ०९.३० वा. पूर्वी सुनिल शिंदे वय ३० वर्ष या तरुणाचा खुन करुन त्याचे प्रेत तिसंगी ते घाटनांद्रे जाणारे रोडचे पुर्वेकडील शेतात टाकल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाणे व स्था.गु.अ. शाखा, सांगली यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अज्ञातांनी दगडाने मारहाण करून खून केल्याची माहिती समजली. सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केलं. सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / संदीप नलावडे, सागर लवटे, सोमनाथ गुंडे व अगर नरळे यांना तांत्रिक माहितीचे आधारे व त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, तिसंगी ते घाटनांद्रे येथील खुनाच्या गुन्हयातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रोड येथे आहे. बातमीप्रमाणे मालगाव गावचे हद्दीत मालगाव ते मिरज जाणारे रोडवर सापळा लावून
पथकाने पळून जाण्याची संधी न देता दोघा संशयितांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता अभिजित सर्जेराव जांभळे, वय १९ वर्षे, रा. गुंडेवाडी, ता.मिरज व विनायक ऊर्फ बंडू बाळू मोहिते, वय ३५ वर्षे, रा. मंगसुळी, ता अथणी, जि. बेळगांव अशी असल्याची सांगितली. त्यांचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवून विनायक मोहिते याने सांगितले की ” मयत सुनिल शिंदे व तो एकमेकाचे मित्र असुन, विनायक मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना त्याने मयतेच्या बहिणी सोबत दुसरे लग्न केल्याने मयत हा विनायक मोहिते यास वारंवार धमकी देत असल्याचे कारणावरुन वरील दोघांनी व त्यांचा पळुन गेलेला मित्र प्रभु तळगडी यांनी त्याचे डोक्यात दगड घालुन खुन केला असलेबाबत सांगितले.

लागलीच सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सदर आरोपीस कवठेमहांकाळ पोलीस ठाणेच्या स्वाधीन केले. पळून गेलेला साथीदार प्रभु तळगडी याचा शोध सुरु आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने केली. पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करत आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button