
आटपाडी तालुक्यांमध्ये कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गावोगावी बांबू लागवड करण्यासाठी मार्गदर्शन दिले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली. परंतु शेतकऱ्यांची बिले अदा करायची म्हटले तर शासनाकडे पैशाचा खडखडाट आहे.
कृषी विभागामार्फत बांबू लागवडीसाठी तालुक्यामध्ये जनजागृती केली जात आहे. तर काही शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली आहे. बांबू लागवड ही रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जात आहे . तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागा मार्फत बांबू लागवड केली आहे. परंतु अद्याप कृषी विभागाकडून एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. शेतकरी मस्टर भरून देत आहेत परंतु त्या रोजगारांच्या नावावर अद्याप एक रुपयाही जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. एक तर रानाची साफसफाई करणे ,खड्डे पाडणे, रोपे विकत आणणे, रोपांची लागवड करणे यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागली आहे. आणि आता शेतकरी बिले कधी निघणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता