
कुपवाड , ता.१९ : आठ लाखांचे ॲल्युमिनियम साहित्य चोरी प्रकरणातील दोन फरार रखवालदार पोलिसांच्या ताब्यात. केतन बाबासाहेब महाजन (रा.शामरावनगर, सांगली) आणि वैभव बाळासाहेब नांदणीकर (रा.बामणोली रोड, कुपवाड) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
औधोगिक वसाहतीमधील रिद्धी सिद्धी ॲल्युमिनियम विंडो प्रोफाईल्स बनविणाऱ्या कंपनीतील दोघा रखवालदारांनी संगनमताने २७ जुलै ते १२ ऑगस्ट कालावधीत रात्रीच्या सुमारास त्यांनी वेळोवेळी जॅकेट मध्ये लपवून आठ लाखांचे साहित्य चोरून नेले. प्रकार उघडकीस येताच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कुपवाड पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक केली.