
कंपनीचे राखवालदारच झाले चोर; आठ लाखांचे ॲल्युमिनियम चोरी पोलिसात दोघांवर गुन्हा
कुपवाड, ता. १७: कंपनीचे राखवालदारच झाले चोर; आठ लाखांचे ॲल्युमिनियम चोरी.औधोगिक वसाहतमधील रिद्धी सिद्धी या ॲल्युमिनियम कारखान्यात दोघां राखवालदारांनीच आठ लाखांचे ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी केल्याची घटना शनिवार रात्री उघडकीस आली. ॲल्युमिनियम साहित्य चोरी प्रकरणी दोघां संसयित राखवालदारांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद करणात आला आहे.
केतन बाबासाहेब महाजन (रा. शामरावनगर, सांगली), वैभव बाळासाहेब नांदणीकर (रा. बामणोली रोड, कुपवाड ता. मिरज) असे दोघां संसयिताची नावे आहेत.
पोलिसांची अधिक माहिती अशी की, रिद्धी सिद्धी ॲल्युमिनियम या कारखान्यात केतन व वैभव हे दोघे राखवालदार काम करतात. या दोघांनी २७ जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून ते १२ ऑगस्ट २०२५ च्या रात्री १२ दरम्यान आपल्या जॅकेटात लपवून कारखान्यातील काहीतरी माल त्याच्या फियाट कार तिचा नंबर एमएच ०४ इडी ६९०७ वाहनातून घेऊन जात असल्याचे कारखान्यातील कर्मचाऱ्यास मंगळवार (ता.१२) सीसीटीव्ही कमेऱ्यात दिसलें. सदर घटनेची वैभवकडे चौकशी केली असता त्याने सरळ उत्तरे न दिल्याने संशयित केतन व वैभव या दोघांनी कारखान्यातील ८ लाख रुपयांचे ५००० किलो कट लेन्थ ॲल्युमिनियम बिलेट्स स्वतःच्या फायद्यासाठी मालकास न विचारता विना परवाना लंपास केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात दिली. दोघेही संसयित फरार आहेत. या घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून दोघा संसयिता राखवालदार विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत मनीष नागराज जैन वय – ५२ वर्षे, व्यवसाय-इंडस्ट्रीज, रा. आदिनाथ डुप्लेक्स, नंबर D/6 मागे सांगली, ता. मिरज यांनी फिर्याद दिली. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे