
सांगलीतील विश्रामबाग 100 फुटी रोडवरील कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कॅफेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित कॅफेची तोडफोड करायला सुरुवात केली. संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 100 फुटी रोडवर असलेले एकापाठोपाठ एक तीन कॅफे फोडण्यात आले. या प्रकरणाची आता संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. कॅफेमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, यावेळी शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आले.