
कुपवाड, ता. २४ : अमोल रायते या सेंट्रींग कामगार तरुणाचा रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर रस्त्यावर त्याच्याच तिघा मित्रांनी मंगळवारी (ता.२२) मध्यरात्री डोक्यावर, छातीवर, तोंडावर व पोटावर चाकू व कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याप्रकरणी तिघांना स्थानिक गुन्हे शाखाने व कुपवाड पोलिसांनी अटक केली होती. संशयितांना गुरुवार (ता.२४) रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेले संशयित निहाल असिफ बावा (वय २० सध्या रा. शंभर फुटी सांगली), प्रेम बाळासाहेब मद्रासी (वय २४), तेजस संजय रजपूत (वय २५ दोघे रा. रामकृष्णनगर, कुपवाड)अशी आहेत. त्यांच्याविरुद्ध कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अधिक तपास कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.