सांगली : प्रतिनिधी

सांगली, ता.२७ : बांधकाम साहित्य नालावर व रस्तावर टाकले प्रकरणी मिरजेतील डॉक्टर यांना ५० हजार दंड आकरण्यात आला. रस्ते नागरिकांच्या रहदारी साठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत नाले ,गटारी मध्ये कोणी अडथळा निर्माण केला तरी कारवाई करण्याचे आदेश सांगली मनपा आयुक्त
सत्यम गांधी यांनी केले होते. दिलेल्या आदेशानुसार उप आयुक्त स्मृती पाटील, डॉ रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील नालावर व रस्त्यावर C & D मटेरिअल टाकले असल्याचे निदर्शनास आले असता डॉ. अनिल चंद्रपट्टन यांना रु. ५०हजार इतक्या रकमेच्या दंड आकारून सदरचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती या वेळी डॉ ताटे यांनी दिली आहे.
यावेळी मा. उपायुक्त स्मुर्ती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. ताटे,स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे, अक्षय कोलप, नितीन कांबळे व मुकादम कर्मचारी उपस्थित होते. तिन्ही शहरातील रस्त्यावर विना परवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे, असे उपआयुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले आहे.