मिरज : प्रतिनिधी

- खटाव ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराची चौकशी सुरू……!
आरग, ता.३: मिरज पूर्व भागातील खटाव ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराची चौकशी करण्यात आली. मिरज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केलेल्या समितीने सखोल दप्तर तपासणी केली. विविध शासकीय योजनेमध्ये गैर व्यवहार, दोषीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे, ग्रामस्थ परशुराम बनसोडे, गणेश खटावकर यांनी केली होती.
ग्रामसेवक संजयकुमार गायकवाड स्वतः पोट ठेकेदार म्हणून काम करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला होता. तसेच ग्रामपंचायतच्या इमारतीवर नागरी सुविधा, जन सुविधा आणि पंधरा वित्त आयोगतून खर्च करण्यात आलेल्या निधीची दप्तर तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत मध्ये बेकायदेशीर कामगार भरतीचा आढावा घेतला. ओढापत्रातील १४ लाख रुपयांच्या रस्ता मुरमीकरणाची स्थळ पाहणी चौकशी समितीने केली. विविध निविदा प्रक्रियेची तपासणी, सलगरे रस्त्यावर ओढापात्र मुजवून केलेल्या रस्त्याची पाहणी समितीने केली.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, मदन यादव शिवानंद कोळी यांनी तपासणी केली.