कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड, ता.२९ : कुपवाड एमआयडीसी मध्ये डंपर व दुचाकीचा भीषण अपघात. या आपघातात दुचाकीस्वार बिराप्पा भगवान रुपनर वय ५६ वर्ष, रा. सावळी, आरटीओ ऑफिस शेजारी ता.मिरज, जि. सांगली हा जागीच ठार झाला आहे. ही घटना मंगळवार (ता.२९) दुपारी एकविसच्या सुमारास कुपवाड तानंग रोड मेनन पिस्टन चौक बाफना कोल्ड स्टोरेज रोडवरील कुपवाड तानंग रोडवर घडली आहे. घटनास्थळावरून डंपर चालकाने पलायन केले असून ही घटना समजताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली असून कुपवाड पोलिसांनी आपघातामधील दोन्ही वाहने MH 10 CJ 4103 दुचाकी व MH 10 CR 2250 हा डंपर जप्त केलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत बिराप्पा रुपनर आपली दुचाकी वरून कुपवाड कडून मेनन पिस्टन चौकाकडे जात असताना तानंग कडून भरधाव वेगाने येणारा डंपरने रुपनर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराच्या डोक्यास व हातास गंभीर इजा झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. घटनास्थळी धाव घेऊन कुपवाड पोलिसांनी आयुष्य हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह नातेवाईकांनी १०८ या रुग्णवाहिकेने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत रमेश रुपनर यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली असून डंपर चालकांवर कुपवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.