
मिरज, ता. ११ : प्रवाशाला उतरण्यासाठी सांगलीत बस थांबवली नाही या कारणाने चौघांकडून बस चालकास मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात विष्णू नारायण पाटील (रा. बिसूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी पाटील बोरीवली-सांगली बसवर वाहक होते. सांगलीत आल्यानंतर पटेल चौक येथे उतरायचे आहे, असे दोन प्रवाशांनी त्यांना सांगितले. पाटील यांनी नकार देताच प्रवाशांनी शिवीगाळ केली व नातेवाइकांना बोलावून घेतले. बस मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज “क्रीडांगणाजवळ आली असता दोघांनी बस अडवून पाटील यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.