
सांगली, ता. १६ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यू. आणि मॉड्युलर ऑपरेशन थेएटर चे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करावी. त्यांना चांगली सुविधा द्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले तर ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार डॉ. सुरेश खाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रियांका राठी, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. रुपेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
वैधकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..


यावेळी प्रास्ताविकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांबद्दल सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन उपवैद्यकीय अधीक्षक रुपेश शिंदे यांनी केले.
सांगली खासदार विशाल पाटील…..


