बामणोली / प्रतिनिधी

बामनोली दत्तनगर येथे मंगळवार (ता.७) रोजी दत्त मंदिरात सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास बामणोली व दत्तनगर मधील रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दत्तनगरमधील रक्तदान शिबिराचे हे दुसरे वर्ष असून या रक्तदान शिबिराचे आयोजन बामणोली संजय (काका) युथ फाऊंडेशनचे सुहास चव्हाण यांनी केले. संजय (काका) फाउंडेशन च्या वतीने रक्तदात्यास गिफ्ट देण्यात आले. वाढदिवसानिमित ४ जानेवारीला बालाजीनगर येथील वृद्धाआश्रमधील निराधार आश्रित व दत्तनगरमधील अनाथ आश्रमातील अनाथ मुलांना अन्नदान करण्यात आले. रक्तदान शिबिरास मा.खा. संजय काका पाटील, मा. जिल्हा उपाध्यक्ष मा अरविंद भाऊ तांबवेकर, सागर पाटील नेते उपस्थित होते.

यावेळी बामणोली उपसरपंच विष्णू लवटे, माजी लोकनियुक्त सरपंच व विधमान सदस्य राजेश सन्नोळी, सामाजिक कार्यकर्ते सुमित यमगर, नितीन पवार, सुरेश साळुंखे, सचिन पवार, प्रकाश माळी, विलास हिप्परकर, संदीप सपकाळ, सचिन चव्हाण, शहाजी माने, लक्ष्मण गरंडे, सुरेश माळी, दिनेश माने, दिगंबर माने, कुमार राठोड आदी उपस्थित होते.