
सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य – राज्यातील चार चाकी वाहन धारकांना १ एप्रिल २०२५पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.