मिरज | प्रतिनिधी

मिरज तालुक्यातील खटाव गावचे श्री यलम्मा देवीची यात्रा सर्वात मोठी व खिलार बैलांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असणारी यात्रा फक्त चार दिवसावर आली आहे. यात्रेमध्ये अनेक धार्मिक व सॉस्कृतिक कार्यक्रम होणार आहे . यामध्ये मौजे खटावमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षीही ” श्री यल्लमा देवीची यात्रा गुरुवार दि. ०५/१२/२०२४ ते शनिवार दिनांक ०७/१२/२०२४ अखेर भरविण्यात येत आहे. यात्रेमध्ये अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे . यामध्ये यात्रेचा पहिला दिवस गुरुवार, दि. ०५/१२/२०२४ रोजी देवीस नैवद्य व गंधोटी यात्रेचा दुसरा दिवस शुक्रवार, दि. ०६/१२/२०२४ रोजी बोनी आहे.
यात्रेचा मुख्य दिवस शनिवार दि. ०७/१२/२०२४ रोजी किच असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे .
तसेच तरी यात्रेतील वरील सर्व कार्यक्रमात सर्वांनी भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात येत आहे.
यात्रेत विविध दुकानदार, हॉटेल, खानावळी व इतर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी यात्रेतील जागेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दि. ०५/१२/२०२४ पूर्वी पैसे भरून अर्ज करावे. कायम हक्काची सबब ऐकली जाणार नाही याची नोंद घ्यावी. एकाच जागेसाठी एका पेक्षा अधिक अर्ज आल्यास ती जागा लिलावाने दिली जाईल. पैसे भरल्याशिवाय जागा दिली जाणार नाही. यात्रेतील शेणखत, पालापाचोळा याचा लिलाव रविवार, दि. ०८/१२/२०२४ रोजी सायं. ५.०० वा. ग्रामपंचायत आवारात करण्यात येईल. लिलावाची पूर्ण रक्कम त्याच दिवशी भरली पाहिजे .असे यात्रेतील विविध कार्यक्रमाचे माहितीचे जाहिरात यात्रा कमिटीने छापली आहे .
यात्रा कमिटीची नियमावली
यात्रेत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये यात्रेत जनावरांना पाण्याची व लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. यात्रेसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेची नियोजन श्री यलम्मा देवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच श्री .रावसाहेब मल्लाप्पा बेडगे, उपसरपंच श्री. व्हन्नाप्पा बाबुराव व्हनानावर तसेच सोसयटी चेअरमन बाळासो व्हणानावर, श्री. भैराप्पा रामगोंडा पाटील ( पोलीस पाटील), सोमलिंग बाबू पुजारी, यात्रा उपसमिती अध्यक्ष
श्री. आप्पासो सोमलिंग पुजारी, यात्रा उपसमिती उपाध्यक्ष श्री. एस. जी. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी, श्री. एस. एस. साळुंखे, ग्राममहसुल अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर सर्व यात्रा समिती सदस्य आणि ग्रामस्थ या सर्वांच्या प्रयत्नांने यात्राचे नियोजन करण्यात आले आहे .