सांगली | प्रतिनिधी

सांगली : महाराष्ट्र राज्यातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण्य पराभव झाला. २८८ जागां पैकी त्यांना फक्त ४९ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवानंतर ईव्हीम घोळ असल्याचे टिका करण्यात आले. ईव्हीम विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, पण कोर्टाने याचिका फेटाळली.सांगली व जतमधून ईव्हीम चा संशय व्यक्त करून सांगली मतदार संघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांनी मतपडताळणीच्या मागणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला असून पृथ्वीराज पाटील यांनी १० बुथची मत पडताळणीची मागणी केलेली आहे तर जतमधून काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांनी २ बुथसाठी मतपडताळणीचा मागणी केली आहे. एका बूथसाठी ४७ हजार २०० रुपये इतके रक्कम भरावी लागते. पृथ्वीराज पाटील यांनी १० बुथसाठी एकूण ४ लाख ७२ हजार रुपये तर विक्रम सावंत यांनी २ बुथसाठी ९४ हजार ४०० रुपयांची रक्कम भरली आहे.