
महायुती सरकार जर आले तर महिलांना २१०० रुपये देणार असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर निवडून आल्यानंतर २१०० देण्याचे सांगितले होते.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून ‘लाडकी बहीण योजना’ चालू केलेली त्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. महिलांना २१०० रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
नुकत्याच निवडणूक झालेल्या विधानसभेत महायुती ने चालु केलेली लाडकी बहीण योजना ही पावरफुल्ल ठरली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रूपये मिळत आहे. आता महायुती सरकार ने महिलांना लाडकी बहीणीचे २१०० देण्याचे सांगितले. एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणीचे २१०० रुपये महिलांना दिले जाणार आहेत. तोपर्यंत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातील, असं सांगण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहेत. राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करेन. त्यानंतर महिलांना २१०० रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.