
नुकत्याच राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महायुतीला घवघवित व मोठं यश मिळालं. महाविकास आघाडीचा दारुण्य पराभव झाला. या विधानसभेत महायुतीला २३० जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या. महाविकास आघाडीच्या या दारुण्य पराभवामुळे महाविकास आघाडी महायुतीवर स्थापनेचा अगोदर ईव्हीएमवरच शंका उपस्थित केली. विरोधकांनी ईव्हीएमधध्ये गडबड झाल्याचा आरोप सुरु केला. ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका डॉ. के.ए. पॉल यांच्याकडून दाखल करण्यात आली होती. मात्र हीच याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराले यांच्या खंडपीठासमोर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीस आल्यानंतर पराभव झाल्यावरच ईव्हीएममध्ये बिघाड का असतो, विजय झाला तेव्हा हा आरोप का होत नाही, असा सवाल केला आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी फेटाळली.