
कुपवाड | प्रतिनिधी
कुपवाड : बहुचर्चित असलेल्या कुपवाड शहरातील मुख्य ट्रिमिक्स रस्ताचे काम कोणत्या न कोणत्या कारणाने समस्याने सारखे बंद पडत आहे. कधी रस्ताचे काम निकृष्ट दर्जाजे होत आहे म्हणून तर कधी विधुत खांब हटविण्याचे कारणाने तर कधी रस्ताचे बाजूने अतिक्रमण झाले आहे. अशा अनेक समस्याने ग्रासलेले आहे कुपवडचा हा ट्रिमिक्स रस्ता. कुपवाडकर रस्ता पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही दिवसापूर्वी कुपवाड मध्ये कुपवाड व्यापार संघटना, कुपवाड संघर्ष समिती व कुपवाडधील नागरिक यांनी बैठक घेऊन कुपवाडचा रस्ताचे काम दिवाळीच्या अगोदर पूर्ण व्हावे असे बैठकीत सहमताने ठरले.
त्या बैठकीनंतर रस्ताच्या कामाची सुरवातही झाली. कुपवाडकर रस्ताचे काम पुन्हा सुरवात झाल्याने खूश झाले पण तो आनंद काय फार काळ काही टिकला नाही. दिवाळी तोंडावर असताना वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत असल्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना न्याहक त्रास होत आहे ही बाब लक्षात घेऊन परत चालू रस्ताचे काम बंद करावे लागले. यामुळे कुपवाडकरांचा अशा ची निराशा झाली. परत रस्ताचे काम जैसे थे झाले. कुपवाडमधील नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की, हा रस्ता या वर्षा अखेररिस तर पूर्ण होऊल का?
कुपवडकरांची आता एकच रास्त अशा आहे की; लवकरात लवकर कुपवाड ट्रिमिक्स रस्ताचे काम पूर्ण व्हावे …….त्रस्त कुपवाडकर