मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मल्लेवाडी तालुका मिरज येथील गट नंबर ५०२/४ या ठिकाणी जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर बोगस नावे टाकून खरेदी दस्त तयार करण्यात आला आहे. खरेदी दस्त करणाऱ्या निबंधकाचे दिशाभूल करून खरेदी केली आहे. त्यामुळे तत्काळ बोगस खरेदी दस्त करणाऱ्या एजंट व दुय्यम निबंधक महसूल मधील अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली व उपविभागीय अधिकारी मिरज व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ते कारवाई करावी असे मागणी संघटनेकडून करण्यात आले आहे. मिरज पूर्व भागामध्ये प्लॉटिंगच्या खरेदी-विक्री करून मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे फसवणूक होत आहे.
मिरज तालुक्यातील वडी विजयनगर मालगाव अशा अनेक ठिकाणी प्लॉटिंग चे काम सध्या सुरू आहे या ठिकाणची ही खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे तात्काळ चौकशी करून संबंधितांना न्याय मिळावा असे मागणी होत आहे.