मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज मतदार संघामध्ये गेले पंधरा वर्षे झाले सुरेश खाडे हे आमदार आहेत. तर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक मोहन वनखडे हे होते. गेले पंधरा वर्षात सुरेश खाडे यांनी जे होलसेल दुकान चालू केले त्याचे कामगार हे मोहन वनखंडे अशी टिका डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी मोहन वनखंडे यांच्यावर केली आहे.
मिरजेच्या विद्यामंदिर या शाळेत शिक्षक असणाऱ्या मोहन वनखडे यांनी एवढी संपत्ती कशी मिळवली याचा त्यांनी खुलासा करावा असा आरोप देखील यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे. यावेळी प्रसार माध्यमांसमोर महेश कांबळे हे बोलत असताना म्हणाले सुरेश खाडे यांच्या जीवावर मोहन वानखडे हे मोठे झाले. त्यांनी स्वतःची आर्थिक प्रगती करून घेतली एवढं करून सुद्धा ते सुरेश खाडे यांचे झाले नाहीत तर मिरजकर जनतेचे काय होणार असा सवाल महेश कांबळे यांनी उपस्थित केला.
समाज कल्याण सभापती ह्या मोहन वनखंडे यांच्या पत्नी असताना त्यांनी अण्णाभाऊ साठे सुधार योजनेतून ३३ कोटी रुपयांचा चुराडा केला असा घनाघात आरोप यावेळी कांबळे यांनी केला. तर या अण्णाभाऊ साठे सुधार योजनेच्या निधीतून कोणत्या वाड्या वस्त्यावर सुधारणा केल्या हे मोहन वनखंडे यांनी दाखवावे. तसेच मिरज शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अशी चर्चा आहे की महेश कांबळे यांना आम्ही मॅनेज करणार आहोत त्यावर कांबळे यांनी जोरदार निशाणा साधत बोलले की मी मोडेन पण वाकणार नाही.
येणारी २०२४ ची विधानसभा मी पूर्ण ताकतीने लढणार असल्याचा इशारा देत कोणताही संभ्रम निर्माण करू नये अन्यथा बाकीच्या सर्व गोष्टी उघड केल्या तर मिरज शहरात वनखंडे यांना तोंड दाखवायची जागा राहणार नसल्याचा इशारा डॉक्टर महेश कांबळे यांनी दिला आहे.