कुपवाड | प्रतिनिधी

कुपवाड परिसरात दोन शाळकरी मुले संशयास्पद दिसून आल्याने त्या अल्पवयीन शाळकरी मुलास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेऊन मुलांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द केले. श्रेयस दादासो यमगर वय 13 वर्षे, धंदा शिक्षण 2) तन्मय परशुराम यमगर वय 13 वर्षे, धंदा शिक्षण दोघे रा आंबाबाई मंदिर पाण्याच्या टाकीजवळ कामेरी ता वाळवा, जि सागंली असे त्यामुलांची नावे आहे.
पोलिसांचा अधिक माहितीनुसार बुधवार (ता.१६) रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुले कुपवाडमधील एका हॉटेल मध्ये काम मागण्यास आले असता, हॉटेल मालकास ती मुले संशयास्पद वाटल्याने हॉटेल मालकांनी कुपवाड पोलिसांत कळीवले. पोलीस हवालदार सरगर व सय्यद यांनी अल्पवयीन दोघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केले असता; ते अल्पवयीन मुले घरात न सांगता आई-वडिलांनी शाळेला जातो असे सांगून घरातुन परस्पर ५००/- रुपये घेऊन कुपवाडमधे कामासाठी आलो आहे असे त्यानी सांगितले. कुपवाड पोलिसांनी तात्काळ त्या मुलांच्या आई-वडिलांना कळवून मोबाईल नंबर प्राप्त करून श्रेयसची आई सौ. राधा यमगर, तन्मयचे मामा देवराज सिंद (रा. भागायवाडी रोड, टेलिफोन ऑफिस समोर सागाव, ता.शिराळा, जि. सागंली)
यांना पोलीस ठाणेत बोलावुन घेवुन सदर दोन्ही मुलांना त्यांचे ताब्यात दिले.