प्रहारचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडेच्या प्रयत्नाने खटावमध्ये बियाण्यांचे वाटप

मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

खटाव तालुका मिरज येथे आज शांती सम्राट शेतकरी गट क्रमांक १ या गटाला कृषी सहाय्यक सचिन पवार यांच्याकडून ज्वारीच्या बियाणांचे वाटप करण्यात आले. मिरज तालुक्यातिल खटाव येथे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांच्या प्रयत्नाने जिल्हा कृषी अधीक्षक विवेक कुंभार व मिरज तालुका कृषी अधिकारी निंबाळकर साहेब यांच्या सहकार्याने १०० किलो बियाण्यांचे नियोजन करून खटाव गावात वाटप करण्यात आले.


खटाव गावात प्रथमच शांती सम्राट 25 शेतकऱ्यांचे गट स्थापन करून शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले होते त्या अनुषंगाने आज खटाव गावात बौद्ध मंदिर या ठिकाणी २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलो असे एकूण १०० किलो ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

खटावतील बौद्ध शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे मिळावे यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक तालुका कृषी अधिकारी निंबाळकर साहेब यांच्याकडे ज्वारी बियाणे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष परशुराम बनसोडे व हनुमंत कांबळे यांच्याकडून मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज बौद्ध मंदिरात कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी ज्वारी बियाण्यांचे वाटप केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत कांबळे माझी ग्रामपंचायत सदस्य तमन्ना कांबळे, कलाप्पा कांबळे, मिथुन कांबळे, श्याम कांबळे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button