सांगली | प्रतिनिधी |

सांगली : संजयनगर परिसरात दोन महिन्यापूर्वी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिग अत्याचार झालेली घटना ताजी असतानाच मंगळवार दि. ८/१०/२०२४ रोजी दुपारी साडे तीनच्या दरम्यान एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २८ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना संजयनगर परिसरात घडली. याबाबत संजयनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून तात्काळ संशयित आरोपी ईश्वर महादेव कांबळे वय २८ वर्ष याला संजयनगर पोलिसांनी अटक केले.
ह्या घटनेने संजयनगर परिसरात तणावाचे वातावरण झाले असून संतप्त झालेल्या नागरिकांकडून संशयित आरोपी ईश्वर कांबळेचे घर व पिडितेवर लैगिक अत्याचार केला त्या सार्वजनिक शौचालयाची तोडफोड नागरिकांकडून करण्यात आली. संतप्त नागरिकांनी रस्तारोक केले. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवाई व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली.
पोलिसांचा अधिक माहितीनुसार संशयित आरोपी ईश्वर कांबळे हा मंगळवार ता.८ दुपारी साडे तीनच्या दरम्यान पिडीत बलिकेला मोबाईल दाखवतो असे सांगत सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन पिडीत बलिकेवर लैंगिक अत्याचार केला. पिडीत बालिकेला त्रास होत असल्याने पिडितेने तिचा आई-बाबस ही घटना सायंकाळी सांगितली. संशयित आरोपी हा पिडीत बलिकेचा शेजारीच होता. ही घटना समजताच घटनास्थळी संजयनगर पोलीसांनी धाव घेऊन संशयित आरोपीला तात्काळ अटक केली. पिडीत बलिकेला वैधकीय तपासनी साठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहे.