
सांगली : मंगळवार दि.८/१०/२०२४ रोजी लक्ष्मी मंदिर मैत्रीण संघटना, सांगली व लोकसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवमहाराष्ट्र हायस्कूल, कुपवाड रोड मैदानावरती नवरात्रोत्सवानिमित्त खास महिलांसाठी ‘महा हदग्याचे’ मैत्रीण संघटना, सांगलीच्या अध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले.
हदग्यासाठी खास आकर्षण कुंथलगिरी रामलिंग मठातील गोंडस हत्ती ( गजलक्ष्मी ) आणण्यात आला होता. सुरवातीला स्त्री सखी महिला मंडळाच्या जया जोशी यांनी जमलेल्या महिला-भगिनींना हदग्याविषयकचे महत्त्व पटवून सांगितले.
खास आकर्षण बबलू हत्ती म्हणजे सांगली शहराचे वैभव होते. दहा वर्षे खराखुरा हत्ती नसल्यामुळे म्हणावा तसा हादगा झाला नाही. काही शाळा व सोडली तर हादगा होत नाही. या हादग्याचे महत्व…
आपली भारतीय जुनी संस्कृती अलिप्त होत चालली आहे. नव्या पिढीला भारतीय जुनी संस्कृती माहितीच नाही. त्यांना आपली जुनी मराठी संस्कृती माहिती होण्यासाठी आज या ‘महा हादगा’ कार्यक्रमाचे संयोजन केले.
हस्त पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. असंख्य महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात हदग्यामध्ये सहभाग नोंदवत विविध गाण्याच्या सुरावरती मनसोक्तपणे फेर धरला. महिलांसोबत शाळेच्या विद्यार्थीनींही हदग्याच्या गाण्यावरती फेर भव्य फेर धरला.
यावेळी कुपवाडातील रक्षक गुरूकल शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण संस्थेमार्फत मार्फत मैदानी खेळ आयोजित करण्यात आले होते. शस्त्रपूजनाने खेळाची सुरवात झाली. महिलांना स्व संरक्षणाचा धडा घ्यावा. असा यामागचा उद्देश असल्याचे केळकर यांनी बोलताना सांगितले. ‘महाहादगा’ अखेरीस सहभागी सर्व महिलांना पौष्टिक आहार देऊन महा हदग्याचा समारोप करण्यात आला.