
तासगवमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमात आजी-माजी खासदारांमध्ये झालेल्या वादावादीनंतर रोहित पाटील प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की; मी या कार्यक्रमास उपस्थित नव्हतो. रिंगरोडबाबत नितीन गडकरी यांनी दिलेला निरोप खासदार विशाल पाटील यांनी तासगावच्या कार्यक्रमात सांगितला.
आमदार सुमन पाटील, खासदार विशाल पाटील व्यासपीठावर होते त्या व्यासपीठाकडे धावून जात शिवीगाळ करण्यात आली. तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ श्रेयवादासाठी हापापलेल्या मंडळींनी या कार्यक्रमात गोंधळ घातला. वैफल्यग्रस्त लोक असे वागतात, अशीही टीका रोहित पाटिल यांनी केली.