कुपवाड – दि. २/१०/२०२४ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघ व कुपवाड पोलीस ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने संवाद बैठक झाली.

तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक दिनाची पार्श्वभूमी सांगून तथास्तु नागरिक संघामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री. गौंडाजे यांनी दिली. यावेळी कुपवाड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तथास्तु ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने श्री भांडवलकर यांनी केला.
यावेळी भूपाल कवठेकर, नेमगोंडा पाटील, कल्लाप्पा कवठेकर, महावीर कोथळे, महावीर कर्नाळे, बाळासाहेब दानोळे, सुमन चंदुरे यांच्यासह वयोवृद्ध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर म्हणाले की; विविध योजनांच्या माध्यमातून शासन ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीसही दक्ष आहेत.
एकल राहणारी व्यक्ती,कुटुंबातील वाद, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास, मालमत्तेतील वाद यासंदर्भात पोलीस हे समन्वयकाची भूमिका स्वीकारून कार्य करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस सदैव दक्ष राहतील, अशी ग्वाही कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली. पुढे बोलताना भांडवलकर म्हणाले की; आपल्या अडचणींच्या निराकरणासाठी आपण पोलिसांशी थेट संपर्क साधावा.
शिवानंद गव्हाणे, स्नेहल गौंडाजे, विजय वाघमारे, उत्तम होनमोरे, दिनकर लोकरे यांनी संयोजन केले.